नेरुळ परिसरात दोन महिलांना लुटले

नवी मुंबई, 29 डिसेंबर 2016/AV News Bureau :

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नेरुळ परिसरात दोन महिलांना लुटण्याचे प्रकार घडल्यामुळे नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे.

नेरुळ सेक्टर 21 मध्ये राहणाऱ्या पौर्णिमा शशी भुषण (34) ही महिला 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.50 च्या सुमारास सीवूड रेल्वे स्थानकातून घराच्या दिशेने पायी जात होत्या. त्याचवेळी सेक्टर 19 मधील यशवंतराव चव्हाण मैदानाजवळील रस्त्यावर मागून आलेल्या मोटार सायकलवरील दोन चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.त्यानंतर भुषण यांना धक्का मारून गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचून नेलं. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दुसऱ्या एका घटनेत सीवूड परिसरात राहणाऱ्या सुधा विश्वनाथ (43) ही महिला 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.20 च्या सुमारास गावदेवी मंदिराच्या समोरील सर्व्हिस रोडवरून जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढला. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.