पनवेल, 27 डिसेंबर 2016/AV News Bureau :
मास्टर मरिन सर्व्हिसेस (अमेया सी.एफ.एस.) कंपनीत कार्यरत असणाऱ्या कामगारांसाठी तीन वर्षांच्या करारानुसार सहा हजार रुपयांची पगारवाढ करण्यात आलीआहे. नवी मुंबई जनरल कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात याप्रकरणी झालेल्या करारानुसार ही पगारवाढ देण्यात येणार असल्याचे संघटनेनं कळविलं आहे.
करारानुसार दरवर्षी 14 टक्के बोनस, एलटीएमध्ये 200 रुपयांची वाढ, पीपीई मध्ये 400 रुपयांची वाढ, दोन स्थानिक सुट्टया मंजूर करण्यात आल्या आहेत. शिवाय साप्ताहिक सुटी तसंच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी डबल ओव्हरटाइम देण्याचं मान्य करण्यात आलं आहे.
या करारावर संघटनेच्यावतीनं अध्यक्ष महेंद्र घरत, उपाध्यक्ष वैभव पाटील यांनी तर कंपनी व्यवस्थापनाच्यावतीनं अध्यक्ष नंदकुमार बने, जनरल मॅनेजर आनंद पानमंदे, किरण वागले आणि कामगार प्रतिनिधी म्हणून रविंद्र पाटील, सुजित म्हात्रे, श्रेयस भगत, महेंद्र भगत, मिथून भगत, छगन ठाकूर, मंगेश डाकी, कुंदन भगत, प्रतिक ठाकूर यांनी स्वाक्षऱ्या केल्याची माहिती महेंद्र घरत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.