पनवेल, 24 डिसेंबर 2016/ AV News Bureau :
विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्याच्यादृष्टिने आयोजित केलेल्या निर्मिती २०१६ प्रदर्शनात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील सीकेटी कॉलेजेच्या इंटीरिअर डिझायनर शाखेतील प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंच्या मदतीने विविध पद्धतीच्या दुकाने , घरे , शॉप्स आदींच्या प्रतिकृती बनविल्या.
प्रसिद्ध वास्तुविशारद विक्रम धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत 22 डिसेंबर रोजी निर्मिती २०१६ प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एस . टी . गडदे हे देखील उपस्थित होते . या प्रदर्शनात प्रथम वर्षाच्या ४२ तर द्वितीय वर्षाच्या ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रदर्शनात नव्या युगातील आरामदायी घरे , बंगलो , कॅफे , केक शॉप्स , ब्युटी पार्लर , हॅन्ड क्राफ्ट ,पॉट्स बनविले आहेत , क्ले , कॉईल वर्क, लाकडाचा भुसा , कपडा , विविध टाकाऊ वास्तूद्वारे याठिकाणी साकारलेल्या कलाकृती पहावयास मिळाल्या.