नवी मुंबई 24 डिसेंबर 2016/AV News Bureau :
नवी मुंबई शहरातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा घाळण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आक्रमक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार ध्वनी प्रदूषण नियमांच्या उल्लंघनाविषयक नागीकांना तक्रार करण्यासाठी सर्व आठही विभाग कार्यलयांत तक्रार निवारण यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. विभाग कार्यलयांचे सहा.आयुक्त / विभाग अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही यंत्रणा राबविण्यात येणार आहे. त्याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पोलीस यंत्रणेला 20 ध्वनीमापक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 173/2010 च्या अनुषंगाने दिलेल्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषण नियम 2000 मधील नियम 7 च्या अंमलबाजवणीबाबत पालिका प्रशासन गंभीर आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरोधात नागरिकांना तक्रारी करता याव्यात यासाठी महापालिका मुख्यालय आणि आठ विभाग कार्यालयांमध्ये विनामूल्य संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
- दिघा विभाग कार्यालय -1800222301
- ऐरोली विभाग कार्यालय -1800222302
- घणसोली विभाग कार्यालय -1800222303
- कोपरखैरणे विभाग कार्यालय – 1800222304
- तुर्भे विभाग कार्यालय -1800222305
- वाशी विभाग कार्यालय -1800222306
- नेरूळ विभाग कार्यालय -1800222307
- बेलापूर विभाग कार्यालय -1800222308
- महापालिका मुख्यालय -1800222309 / 10
नागरिक या विनामूल्य टोल फ्री क्रमांकांचा उपयोग करून आपली ध्वनी प्रदूषण नियमांच्या उल्लंघनाविषयीची तक्रार नोंदवू शकतात.
तक्रारीसाठी इतरही पर्याय
- 8422955912 या मोबाईल व्हॉटस् ॲप क्रमांकावरही नागरिक तक्रार दाखल करू शकतात.
- सर्व कार्यालयांमध्ये याकरीता तक्रार वही ठेवण्यात आलेली आहे. याव्दारे प्राप्त तक्रारींची दखल घेण्यात येऊन त्याविषयीच्या कार्यवाहीची माहिती संबंधित तक्रारदारांस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- महानगरपालिकेच्याnmmc.gov.in या वेबसाईटवरील ‘तक्रार निवारण प्रणाली (Grievance Redressal System)’ मध्येही सुलभ रितीने आपली ध्वनीप्रदूषणाविषयीची तक्रार सुलभ रितीने दाखल करू शकतात. ही तक्रार निवारण प्रणाली आता ‘nmmc e-connect’ ॲपव्दारे नागरिकांच्या मोबाईल फोनवरही उपलब्ध असून नागरिक सहजगत्या असतील तेथून एका स्क्रीन टचवर आपली तक्रार दाखल करू शकतात.