24 डिसेंबरला वाशीत ‘वॉक विथ कमिशनर’

नवी मुंबई, 22 डिसेंबर 2016 / AV News Bureau :

नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे येत्या 24 डिसेंबर रोजी, सकाळी 6.30 वा. माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान, सेक्टर 17, वाशी येथे महापालिका आयुक्त अधिका-यांसह नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

जे नागरिक आपल्या तक्रारी / सूचना / संकल्पना महापालिका आयुक्त  यांच्याकडे सादर करु इच्छितात, त्यांनी त्या लेखी स्वरूपात सोबत घेऊन याव्यात. नागरिकांनी  उद्यानात सकाळी 6.00 वाजल्यापासून  उपस्थित असणा-या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे असे पालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.