नवी मुंबई, 22 डिसेंबर 2016 / AV News Bureau :
महावितरण कंपनीच्या वाशी विभागातील वीज वाहिनीचे देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी, २३ डिसेंबर रोजी वाशीतील काही भागांमध्ये वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
महावितरणच्या वाशी भागातील २२ के.व्ही. फिडर – ५ या वीज वाहिनीवरून कोपरखैरणे सेक्टंर – १४ ते २३, कोपरखैरणे व्हिलेज, सेक्टंर – १, १A, २, २A, ३, ४ आदी परिसराला वीज पुरवठा करण्यात येतो. मात्र वीज वाहिनींच्या देखभालीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या वीज वाहिनीवरून करण्यात येणारा वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय वीज वितरण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे उद्या, शुक्रवारी सकाळी १०.०० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत वाशी परिसरातील काही भागांमध्ये वीज पुरवठा करण्यात येणार नसल्याचे वीज वितरण कंपनीने जाहीर केले आहे.