मुंबई,16 डिसेंबर 2016 /AV News Bureau :
दिवा रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्य रेल्वेने दिलासा दिला आहे. दिवा रेल्वेस्थानकात यापुढे अप आणि डाउन या दोन्ही मार्गांवर २४ जलद गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.
डाउन मार्गावरील गाड्या (सीएसटीहून सुटणाऱ्या )
- सीएसटीहून सकाळी ६.१० ला सुटणारी सीएसटी –कर्जत ही गाडी दिवा स्थानकात सकाळी ६.५७ वाजता पोहोचेल.
- सीएसटीहून सकाळी ७.५३ ला सुटणारी सीएसटी –खोपोली ही गाडी दिवा स्थानकात सकाळी ८.४० वाजता पोहोचेल.
- सीएसटीहून सकाळी ८.२० ला सुटणारी सीएसटी –कर्जत ही गाडी दिवा स्थानकात सकाळी ९.१६ वाजता पोहोचेल.
- सीएसटीहून सकाळी ९.१५ ला सुटणारी सीएसटी –बदलापूर ही गाडी दिवा स्थानकात सकाळी १०.२ वाजता पोहोचेल.
- सीएसटीहून सकाळी १०.२० ला सुटणारी सीएसटी –कसारा ही गाडी दिवा स्थानकात सकाळी ११.७ वाजता पोहोचेल.
- सीएसटीहून सकाळी ११.२२ ला सुटणारी सीएसटी –अंबरनाथ ही गाडी दिवा स्थानकात दुपारी १२.९ वाजता पोहोचेल.
- सीएसटीहून सकाळी दुपारी १.१५ ला सुटणारी सीएसटी –कर्जत ही गाडी दिवा स्थानकात दुपारी २.२ वाजता पोहोचेल.
- सीएसटीहून सायंकाळी ५.१८ ला सुटणारी सीएसटी – आसनगाव ही गाडी दिवा स्थानकात सायंकाळी ६.८ वाजता पोहोचेल.
- सीएसटीहून सायंकाळी ५.५९ ला सुटणारी सीएसटी – टिटवाळा ही गाडी दिवा स्थानकात सायंकाळी ६.४७ वाजता पोहोचेल.
- सीएसटीहून सायंकाळी ६.२१ ला सुटणारी सीएसटी –कर्जत ही गाडी दिवा स्थानकात सायंकाळी ७.९ वाजता पोहोचेल.
- सीएसटीहून रात्री ८.४८ ला सुटणारी सीएसटी –खोपोली ही गाडी दिवा स्थानकात रात्री ९.३६ वाजता पोहोचेल.
अप मार्गाववरील गाड्या (सीएसटीकडे जाणाऱ्या)
- कर्जतहून सकाळी ५.५३ ला सुटणारी कर्जत-सीएसटी ही गाडी सकाळी ६.५५ ला दिवा स्थानकात पोहोचेल.
- कसाराहून सकाळी ६.४३ ला सुटणारी कसारा-सीएसटी ही गाडी सकाळी ८.८ ला दिवा स्थानकात पोहोचेल.
- अंबरनाथहून सकाळी ८.४५ ला सुटणारी अंबरनाथ-सीएसटी ही गाडी सकाळी ९.९ ला दिवा स्थानकात पोहोचेल.
- खोपोलीहून सकाळी ९.१९ ला सुटणारी खोपोली – सीएसटी ही गाडी सकाळी १०.५० ला दिवा स्थानकात पोहोचेल.
- कसाराहून सकाळी १०.१० ला सुटणारी कसारा-सीएसटी ही गाडी सकाळी ११३४ ला दिवा स्थानकात पोहोचेल.
- कर्जहून दुपारी १२.१ ला सुटणारी कर्जत-सीएसटी ही गाडी दुपारी १.४ ला दिवा स्थानकात पोहोचेल.
- बदलापूरहून दुपारी १.२२ ला सुटणारी बदलापूर-सीएसटी ही गाडी दुपारी १.५३ ला दिवा स्थानकात पोहोचेल.
- कसाराहून दुपारी १.३२ ला सुटणारी कसारा-सीएसटी ही गाडी दुपारी २.५६ ला दिवा स्थानकात पोहोचेल.
- कसाराहून दुपारी ३.३७ ला सुटणारी कसारा-सीएसटी ही गाडी दुपारी ५.१ ला दिवा स्थानकात पोहोचेल.
- बदलापूरहून सायंकाळी ५.४ ला सुटणारी कसारा-सीएसटी ही गाडी सायंकाळी ५.३६ ला दिवा स्थानकात पोहोचेल.
- टिटवाळाहून सायंकाळी ६.२१ ला सुटणारी टिटवाळा -सीएसटी ही गाडी सायंकाळी ६.४९ ला दिवा स्थानकात पोहोचेल.
- कर्जतहून सायंकाळी६.४२ ला सुटणारी कर्जत-सीएसटी ही गाडी सायंकाळी ७.४५ ला दिवा स्थानकात पोहोचेल.