नवी मुंबई /AV News Newsbureau :
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम विरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली असून तुर्भे, वाशी, घणसोली भागातील अनेक अनधिकृत बामधकामे अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केली आहेत.
तुर्भे सेक्टर 23 मधील जनता मार्केट येथील विकास बार ॲन्ड रेस्टॉरंट येथे अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात आले होते. सदर बांधकाम निष्कासीत करण्यात आले.त्याचप्रमाणे वाशी से. 8 येथील चिनाब हॉटेलमध्ये मार्जिनल स्पेसचा वापर केला जात होता. त्याठिकाणीही कारवाई करण्यात आली. त्याशिवाय घणसोली विभागातील राबाडा रेल्वे स्टेशन समोरील नव्याने बांधल्या जात असलेल्या अनधिकृत 63 झोपड्यांवर कारवाई करून त्या हटविण्यात आल्या.
महापालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली तुर्भे विभागाच्या सहा. आयुक्त अंगाई साळुखे, वाशी विभागाचे विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके व घणसोली विभागाचे सहा. आयुक्त दत्तात्रय नागरे व पालिका आणि पेलीस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.