कोकण,गोव्यासाठी हिवाळी विशेष रेल्वे गाड्या

नवीन वर्षाचे स्वागत, ख्रिसमस आणि हिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मध्य आणि कोकण रेल्वेचा निर्णय

नवी मुंबई,11 डिसेंबर 2016 / AV News Bureau:

नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा तसेच कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर 98 हिवाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सीएसटी/ एलटीटीई ते करमाळी, सावंतवाडी रोड, तिरुनवेली आणि पुणे –करमाळी/ मंगलोर जंक्शन या मार्गांवर या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. हिवाळी सुट्टीमध्ये कोकणात तसेच गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येणाऱ्या हिवाळी गाड्यांचा तपशिल :

 गाडी क्रमांक 01409/ 014010 पुणे-करमाळी-पुणे (साप्ताहिक)

  • गाडी क्रमांक 01409 ही साप्ताहिक गाडी 15, 22 आणि 29 डिसेंबर 2016 तसेच 5 आणि 12 जानेवारी 2017 या दिवशी रात्री 8.20 मिनिटांनी पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01410 ही साप्ताहिक गाडी 16, 23 आणि 30 डिसेंबर 2016 तसेच 6 आणि 13 जानेवारी 2017 या दिवशी दुपारी 1.35 ला करमाळीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2.35 वाजता पुणे रेल्वे स्थानकात पोहोचेल. या गाडीचे आरक्षण 13 डिसेंबर 2016 पासून सुरू होईल.
  • 15 डब्यांच्या या गाड्या लोणावळा, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि थिविम रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक 01095/ 01096 मुंबई-सीएसटी ते सावंतवाडी-मुंबई सीएसटी (आठवड्यात तीनदा)

  • गाडी क्रमांक 01095 ही गाडी 22, 24,26, 29 आणि 31 डिसेंबर 2016 तसेच 2, 5, 7, 9 आणि 12 जानेवारी 2017 या दिवशी पहाटे 5.15 वाजता सीएसटीहून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 4.30 वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01096 ही गाडी 23, 25,27, 30 डिसेंबर 2016 तसेच 1,3, 6, 8, 10 आणि 13 जानेवारी 2017 या दिवशी सकाळी 7.30 वाजता सावंतवाडीहून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5.17 वाजता सीएसटी रेल्वे स्थानकात पोहोचेल. या गाडीचे आरक्षण 13 डिसेंबर 2016 रोजी सुरू होईल.
  • 12 डब्यांच्या या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापुर, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वेस्थानकांवर थांबणार आहे.

गाडी क्रमांक 01041/01042 लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी- लोकमान्य टिळक टर्मिनस (साप्ताहिक)

  • गाडी क्रमांक 01041 ही साप्ताहिक गाडी 16, 23 आणि 30 डिसेंबर 2016 तसेच 6 आणि 13 जानेवारी 2017 या दिवशी रात्री 1.10 मिनिटांनी एलटीटीहून सुटेल आणि त्याचदिवशी सकाळी 11.30 वाजता करमाळी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01042 ही साप्ताहिक गाडी 16, 23 आणि 30 डिसेंबर 2016 तसेच 6 आणि 13 जानेवारी 2017 या दिवशी दुपारी 12.10 मिनिटांनी करमाळीहून सुटेल आणि त्याचदिवशी रात्री 11.15 वाजता एलटीटी रेल्वे स्थानकात पोहोचेल.या गाडीचे आरक्षण 13 डिसेंबर 2016 ला सुरू होईल.
  • 14 डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम रेल्वे स्थानकांत थांबेल.

गाडी क्रमांक 01039 आणि 01040 सीएसटी-करमाळी-सीएसटी (आठवड्यात चारवेळा)

  • गाडी क्रमांक 01039 ही गाडी 17, 18, 20, 21, 24, 25, 27, 28 आणि 31 डिसेंबर 2016 तसेच 1, 3, 4, 7, 8, 10, 11 आणि 14 जानेवारी 2017 या दिवशी रात्री 12.20 ला सीएसटीहून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.30 वाजता करमाळी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01040 ही गाडी 17, 18, 20, 21, 24, 25, 27, 28 आणि 31 डिसेंबर 2016 तसेच 1, 3, 4, 7, 8, 10, 11 आणि 14 जानेवारी 2017 या दिवशी दुपारी 12.20 ला करमाळीहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.45 ला सीएसटी रेल्वे स्थानकात पोहोचेल. या गाडीचे आरक्षण 13 डिसेंबरला सुरू होईल.
  • 15 डब्यांच्या या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम रेल्वे स्थानकांत थांबणार आहेत.

गाडी  क्रमांक 01067 आणि 01068 सीएसटी-तिरुनवेली-सीएसटी (साप्ताहिक)

  • गाडी क्रमांक 01067 ही गाडी 18,25 डिसेंबर 2016 तसेच 1, 8, 15 जानेवारी 2017 या दिवशी दुपारी 4.40 ला सीएसटीहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी  पहाटे 2.15  वाजता तिरुनवेली रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01068 ही गाडी 20,27 डिसेंबर 2016 तसेच 3, 10, 17 जानेवारी 2017 या दिवशी पहाटे 4.45 ला तिरुनवेलीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी  दुपारी  30  वाजता सीएसटी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  • 15 डब्यांची ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मगडाव, कारवार, कुमठा, मूकांबिका रोड, बायंदूर, उडुपी, मुल्कि, मंगलोर जंक्शन, कारगड, कन्नुर, तिरुवाला, चेंगान्नुर, कयानकुलम, कोल्लम, त्रिवेंद्रम, नेय्यातिनकरा, कुलित्तुरल, एरानेल, नागरकोईल शहर आणि वेल्लुर या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

 

गाडी क्रमांक ०१३०१ आणि ०१३०२ पुणे-मंगलोर-पुणे (साप्ताहिक)

  • गाडी क्रमांक 01301 ही गाडी 17,24,31 डिसेंबर 2016 तसेच 7,14 जानेवारी 2017 या दिवशी दुपारी 4.10 ला पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी  सकाळी 10.55  वाजता मंगलोर रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01302 ही गाडी 18,25 डिसेंबर 2016 तसेच 1,8,15 जानेवारी 2017 या दिवशी दुपारी 12.50 ला मंगलोरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी  सकाळी 8.15 ला   वाजता पुणे  रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  • 15 डब्यांची ही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, कुमठा, मुकांबिका रोड, बायंदूर, उडुपि आणि मुल्कि रेल्वे स्थानकांवर थांबेल.