फेब्रुवारी 2017 मधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका
पनवेल,9 डिसेंबर 2016 /AV News Bureau :
फेब्रुवारी 2017 मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पनवेल तालुका कॉंग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी करीत आहेत. स्थानिक कॉंग्रेस नेते महेंद्र घरत यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकांची तयारी करण्याचे आवाहन केले आहे.
पनवेल तालुका कॉंग्रेसच्यावतीने 8 आणि 9 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद आणइ पंचायत समिती मतदार घातील प्रमुख कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी केळवणे व गुळसुंदे जिल्हा परिषद मतदार संघातील बैठकीमध्ये बोलताना घरत यांनी स्वबळावर लढण्याबाबत कार्यकर्त्यांना आवाहन केले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आघाडीसाठी अन्य पक्ष प्रयत्नशील असले तरी आपण सर्वच उमेदवारांची तयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे घरत यांनी सांगितले.
या बैठकीला कामगार नेते श्याम म्हात्रे, तालुका अध्यक्ष नारायणशेठ ठाकूर, युवा अध्यक्ष हेमराज म्हात्रे, अभिजित पाटील, महादेव कटेकर, भीमसेन माळी आदी नेत्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची नावे सुचविण्यात आली. मात्र या संदर्भात तालुका जिल्हा कार्यकारिणीत विचार विनिमिय करून नावे निश्चित करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.