ठाणे,2 डिसेंबर 2016/AV News Bureau :
किशोरवयीन मुलांमध्ये योग्य मार्गदर्शनाअभावी निर्माण होणाऱ्या समस्यांविषयी जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे महापालिका शाळांमधील इयत्ता 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी लैंगिक शिक्षणविषयी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
हा उपक्रम महापालिका शाळांमधील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांसाठी ठाण्यातील इन्स्टिट्युट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) या संस्थेच्या माध्यमातून हे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानाअंतर्गत प्रामुख्याने कुमारवय, करियर, ताणतणाव नियोजन, नातेसंबंध, व्यसनविरोधी विचार आणि मूल्यशिक्षण आदी घटकांचा समावेश आहे. विविध दहा तुकड्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.