मुंबई, 2 डिसेंबर2016 / AV News Bureau :
प्रवाशांकडून सातत्याने होणारी मागणी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने 1 डिसेंबर 2016 पासून दादर रेल्वे स्थानक पूर्व ते मुंबईच्या उपनगरांमध्ये रात्री उशिरापर्यंत बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचा शुभारंभ बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मिठबावकर यांच्या हस्ते दादर रेल्वे स्थानक पूर्व येथे पार पडला.
- बस मार्ग क्र. २०२ (मर्यादित) चा बसमार्ग दादर रेल्वे स्थानक पूर्व ते गोराई आगार असा राहणार आहे.
- बस मार्ग क्र. ४ (मर्यादित)- दादर रेल्वे स्थानक पूर्व ते ओशिवरा आगार- रात्रौ २. २५ रात्रौ २. २५ वाजता
- बस मार्ग क्र. ३०२ (मर्यादित)- दादर रेल्वे स्थानक पूर्व ते मुलूंड स्थानक पश्चिम- रात्रौ २. ३० वाजता,
- बस मार्ग क्र. ५२१ (मर्यादित)- दादर रेल्वे स्थानक पूर्व ते कोपरखैराणे- पहाटे ४. ०० वाजता
या बससेवांप्रमाणे इतरही मार्गावर विशेष बस चालविण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.