पोस्टामधून 3,680 कोटीच्या नोटा बदलल्या

नवी दिल्ली,30 नोव्हेंबर 2016:

केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपये किमतीच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशभरातील 1.55 लाख पोस्ट कार्यालयांमध्ये 32,631 कोटी रुपये जमा झाले आहेत. सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांनी पोस्टातून तब्बल 3,680 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतल्या आहेत.

नोटाबंदी निर्णयानंतर

10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या काळात 3,680 कोटी रुपये किमतीच्या 578 लाख नोटा नागरिकांना बदलून देण्यात आल्या आहेत. याच काळात 500 आणि 1000 च्या 43.48 लाख देशभरातील टपाल खात्यांमध्ये जमा झाल्याची आणि 3583 कोटी रुपये इतकी रक्कम नागरिकांनी काढली आहे.

ग्रामीण भाग आघाडीवर

केंद्र सरकारच्या 500 आणि 1000 रुपये किमतीच्या चलनातील नोटा बंद झाल्यानंतर त्या बदलून देण्याच्या प्रक्रियेमध्ये टपाल खात्याने अतिशय महत्वाची कामगिरी केली आहे. यामध्ये 1.30 टपाल कार्यालये ग्रामीण भागामध्ये तर 25 हजार टपाल कार्यालये शहरी आणि अर्धशहरी क्षेत्रातील आहेत. टपाल कार्यालयांमध्ये नोटा बदलण्याचे प्रमाण ग्रामीण भागात 88 टक्के इतके असल्याचे समोर आले आहे.