सार्वजनिक शौचालय वापर करणेबाबत Community Triggerting चे आयोजन
नवी मुंबई,23 नोव्हेंबर 2016 /AV News Bureau :
“स्वच्छ भारत मिशन” (नागरी) अंतर्गत महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्त (ODF) घोषित करण्याच्या धेय्य पुर्तीसाठी व उघड्यावर शौचास जाणा-या नागरिकांना सामुदायिक / सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्याकरीता प्रबोधन करणेसाठी 16ते 30 नोव्हेंबर या काळात ‘Community Triggering’ चे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार 22 नोव्हेंबर रोजी घणसोली विभागातील साठेनगर व सम्राट नगर या भागामध्ये उघड्यावर शौचास जाणा-या नागरिकांचे प्रबोधन करून त्यांच्या वर्तणुकीत बदल घडविण्याकरीता झोपडपट्टी भागामध्ये रहिवाश्यांना सामुदायिक / सार्वजनिक शौचालयाचा वापर करणेबाबत ‘Community Triggering’ चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थितांना सार्वजनिक स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने उघडयावर शौचास न जाणे, वैयक्तिक शौचालय / सामुदायिक / सार्वजनिक शौचालयांचा वापर करणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे याबाबत प्रबोधन केले. सदर विशेष कार्यक्रमामध्ये घणसोली विभागाचे स्वच्छता निरिक्षक जाधव, उप स्वच्छता निरिक्षक वाळवी, उप स्वच्छता निरिक्षक किनी, स्वच्छाग्रही व नागरिक उपस्थित होते.