मुंबई,14 नोव्हेंबर 2016 :
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या गोलमाल – 4 च्या मध्ये अभिनेत्री परिणिती चोप्रा हिला संधी मिळाली आहे. करिना कपूर गर्भवती असल्यामुळे गोलमालच्या चौथ्या भागासाठी नव्या नायिकेचा शोध सुरू होता. सुरुवातीला अलिया भट आणि दिपीका पदुकोन यांच्या नावाची चर्चा होती.मात्र अचानक परिणितीच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. नव्या वर्षात शुटींग सुरू होणार असून दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या गोलमाल सिरिजने बॉलिवूडमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गोलमालच्या पहिल्या तिन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर रोहित शेट्टी यांनी गोलमाल- 4 साठी जुळवाजुळव सुरू केली आहे. गोलमालच्या पहिल्या भागात रिमी सेन नायिकेच्या भूमिकेत होती. मात्र गोलमाल -2 आणि 3 मध्ये करिना कपूरची वर्णी लागली. अजय देवगण आणि इतर कलाकारांसोबत करिनाची केमिस्ट्री चांगलीच जमल्यामुळे गोलमालच्या पुढच्या भागातही तीच असणार हे गृहित होते. मात्र करिना कपूर गर्भवती असल्यामुळे तिने काही काळ शुटींगपासून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे रोहित शेट्टीने नव्या नायिकेचा शोध सुरू केला होता. सध्याच्या आघाडीच्या दिपिका पदुकोन आणि अलिया भट यांच्या नावाची चर्चाही सुरू होती. मात्र शेवटी परिणिताच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. परिणिताच्या निवडीचे या चित्रपटातील मुख्य अभिनेता अजय देवगणने स्वागत केले आहे. तर परिणितानेदेखील चित्रपटात संधी दिल्याबद्दल अजयचे आभार मानले आहे. ‘गोलमाल’च्या परिवाराचा एक भाग होण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप उत्साही आहे, असे परिणिता चोप्राने म्हटले आहे.